शहरातील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून, आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
नेमका प्रकरण काय?
संबंधित कंपनीत काम करणाऱ्या काही पीडित महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. एका विशिष्ट धर्माच्या सहा जणांकडून गेल्या काही महिन्यांपासून महिलांचा विनयभंग आणि अत्याचार केला जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, महिलांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याचेही पीडितांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून 6 संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
