मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटका अन् आता लष्कराकडून सन्मान; लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदी बढती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता झालेले भारतीय लष्करातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना आता ब्रिगेडियर पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. लष्कराने त्यांना या वरिष्ठ पदासाठी पात्र ठरवले असून, संबंधित प्रशासकीय प्रक्रियेनंतर त्यांच्या पदोन्नतीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुमारे 17 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर लष्कराने हा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नेमके काय होते सर्व प्रकरण?

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौक भागात झालेल्या एका स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 95 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. दहशतवादाशी संबंधित आरोपांखाली अटक झालेले ते पहिलेच कार्यरत लष्करी अधिकारी होते. 2011 मध्ये हा तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आला. अखेर जुलै 2025 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने पुराव्याअभावी कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर पाच जणांची सर्व आरोपांतून मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *