दादरऐवजी दिव्यावरूनच सुटणार ‘रत्नागिरी पॅसेंजर’, प्रकल्प सध्या लांबणीवर; पाचव्या-सहाव्या मार्गिकेची प्रतीक्षा

कोकणवासीयांची पसंतीची गाडी असलेली ‘दादर-रत्नागिरी’साठी प्रवाशांना आता अनिश्चित काळापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या सीएसएमटी-कुर्ला पाचव्या/सहाव्या मार्गिका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दादर-रत्नागिरी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाला प्रकल्पाची कालमर्यादा विचारली असता भूसंपादन पूर्ण झाल्यावर ते निश्चित होणार असल्याने दादर-रत्नागिरी आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील प्रवाशांची संख्या अधिक

नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक वर्षातील महसूल वाढीच्या विक्रमाबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या प्रतीक गोस्वामी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील कार्यक्रमात रेल्वेचे सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेवरील लोकल विलंब, धीम्या गतीने सुरू असलेले १५ डब्यांचे काम आणि दादर-रत्नागिरीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. दादर-रत्नागिरी एक्सप्रेस दिव्यावरून सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये नाराजी आहे. लालबाग, परळसह दक्षिण मुंबईत आणि पश्चिम रेल्वेवर राहणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रवासी मागणी अधिक असल्याने ही गाडी पुन्हा दादरवरून सुरू होणार की नाही, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला.

‘सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिका प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित होईल. सध्या दादरवरून ही गाडी चालवल्यास उपनगरी रेल्वेच्या वक्तशीरपणावर त्याचा परिणाम होतो. सर्वविचारांती २०२१ मध्ये ही गाडी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही स्पष्टीकरण महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी दिले.

‘त्या’ रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १६ वर्षांनी भरपाई

बोरिवलीला जाताना मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलमधून पडून मृत्यू झाला असतानाही रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने नकार दिला होता. तसेच रेल्वे अपघात न्यायाधिकरणानेही भरपाईचा दावा फेटाळला होता. अखेर न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत भरपाई देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने या कुटुंबाला १६ वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने ५ मार्च २०२१ रोजी दावा फेटाळल्याने भारती सोनावणे व त्यांच्या दोन मुलींनी अॅड. मोहन राव यांच्यामार्फत अपिलाद्वारे दाद मागितली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्या. राजेश पाटील यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *