शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी मुलाच्या प्रगतीसाठी रक्ताने आंघोळ केली असा खळबळजनक दावा भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. आता हे रक्त कोणाचे होते काय माहित की यांनी नरबळी दिला आहे? अशी शंकाही त्यांनी बोलून दाखववली आहे. यांच्या घरी दोन दिवस खरात गेले होते तिथे तांत्रिक पूजा करण्यात आली असा त्यांचा दावा आहे. जंयत पाटलांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
जयंत पाटील एकीकडे आम्ही पुरोगामी आहेत, आम्ही देवाला मानत नाही असं बोलतात आणि दुसरीकडे खरात यांच्याकडे जाऊन पूजा, तंत्रमंत्र करत लोकांना, मतदारांना फसवतात. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी रक्ताने आंघोळ केली. आता हे रक्त कोणाचे होते काय माहित की यांनी नरबळी दिला आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
“तुम्ही देवाला मानता, मग लोकांना का फसवत आहात? तुम्ही तुमच्या मतदारांना फसवून त्यांची मतं घेत आहात. तुमची विचारसरणी पुरोगामी आहे सांगून फसवणूक केली आहे. जयंत पाटील सुसंस्कृत माणूस आहे असं सगळीकडे वातावरण आहे, मी तरी मानत नाही. त्यांच्यावर फार चांगले संस्कार झाले आहेत. मग हा कुठला संस्कार आहे की जो बाबा गर्भवती बाईवर अत्याचार करतो, तो जयंत पाटलांचा गुरु आहे. याच्यावर खुली चर्चा झाली पाहिजे”, असं त्यांनी सांगितलं आहे.
जो बाबा महिलांच्या पतीला बाहेर बसवायचा, पारदर्शक काचेच्या आत असले अत्याचाराचे उद्योग ऑफिसात करायचा. त्यांचे हे सगळे भक्त आहेत. जयंत पाटलांची चौकशी होण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं आहे. रोहित पवार देव न मानणारे हेही कामाख्या देवीला गेले होते त्याचा फोटो ही माझ्याकडे आहे असाही दावा त्यांनी केला.
