अशोक खरातने 5 नरबळी घेतल्याचा संशय, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात याला एसआयटीच्या पथकाने नाशिक न्यायालयात हजर केलं. यावेळी सरकारी वकिलांनी महत्त्वाचे मुद्दे आपल्या युक्तिवाद मांडले. अशोक खरात याने 5 नगरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या पिस्तूलातून 5 गोळ्या मिसिंग आहेत. त्यामुळे त्याने 5 नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सरकारी वकिलांनी कोर्टात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. यानंतर कोर्टाने अशोक खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *