‘कनेक्टिंग लिंकवर बोलल्याने महाराष्ट्राचा अपमान कसा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेचा आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने खास कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कनेक्टिंग लिंक ते राम मंदिर या मुद्द्यांवरुन राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. कनेक्टिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? असा सवाल त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात काही भागांत पूरसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर, अनेक बांधकामांनाही फटका बसला. मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर खड्डे आणि दरड कोसळल्याने सरकारवर टीका करण्यात आली. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले होते. मात्र राज ठाकरे यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. कनेक्टिंग लिंकवर बोललो तर त्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला? असा सवाल त्यांनी केला आहे.

कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली त्यावर राजकारण करू नका असं ते म्हणतात. पण जेव्हा दुसऱ्यांची सरकार होती तेव्ही तुम्ही काय करत होतात. तेव्हा ते आंदोलन कशासाठी होतं. म्हणजे आपण केलं ते राजकारण नाही का? कनेक्टिंग लिंकवर आपण बोललो तर त्यात महाराष्ट्र कुठून आला. त्यांच्या आता अंगलट आले आहे. पण तुम्हीच असं राजकारण केलं ना? कनेक्टिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.

 

‘मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केले ते म्हणाले की आम्ही बघून घेऊ. तुम्ही मुख्यमंत्री आहेत ना? ही भाषा? हे वाक्य झाल्या झाल्या लगेच हिंदीत बोलायला लागले. पण का? हिंदी कोणासाठी? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचे असेल की देख लुंगा? असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, बघून घेऊन ही भाषा कुठून आली? सुसंस्कृत महाराष्ट्राचे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून कारवाईच्या अपेक्षा होती,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘कनेक्टिंग लिंकच्या उभारणीसाठी जर बाहेरच्या देशाची टेक्नॉलॉजी वापरली तरी कंत्राटदार भारताचाच आहे. पूल आणि रस्ते तयार करणे म्हणजे विकास होत नाही. 1947 साली ब्रिटिश गेले. टिळक ब्रिजपासून अनेक ब्रिज त्यांच्या काळात बांधण्यात आली. प्रत्येक कामाची गॅरंटी 100 वर्षाची असते. आणि आपण काम करतोय त्याची गॅरंटी किती?,’ असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *