छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथून रत्नागिरी-सावंतवाडी अशा थेट मेल-एक्स्प्रेसची कमतरता असताना आहे त्या गाड्यांचे मुंबईतील थांबे बदलले जात आहेत. तर दुसरीकडे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना मात्र हिरवा कंदिल दाखवला जात आहे. दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस बाबतही असा प्रकार घडला. परिचालनातील अडचणींचे कारण देऊन ही एक्स्प्रेस दिवा स्थानकातून रवाना करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने दादर-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतला.
यामुळे कोकणवासींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही ही ‘चूक’ तत्काळ दुरुस्त करा, असा सल्ला दिला. दादर-गोरखपूर ही विशेष एक्स्प्रेस दोन वर्षांपासून चालवली जात होती. ती कायम करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला. भाजप नेते रवी किशन यांनी याबाबतचे पत्र बुधवारी ‘एक्स’वर पोस्ट केले होते. यानंतर ‘कृपया या निर्णयात तत्काळ सुधारणा करावी. या समस्येमुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे’ असे प्रभू यांनी सोशल मीडियावर नमूद केले.
मध्य रेल्वे म्हणते… अडचणींमुळे निर्णय
‘उपनगरी गाड्यांमुळे दादर-रत्नागिरी गाडी चालविताना परिचालन अडचणी उद्भवतात. कोकणाकडून येणारी गाडी दिवा स्थानकात प्रवेश करताना किंवा तेथून बाहेर पडताना मुख्य मार्गावर येण्यासाठी दिवा किंवा विद्याविहार परिसरात सहा ते आठ मुंबई उपनगरी गाड्या सहा ते दहा मिनिटे थांबवाव्या
