टिटवाळ्यात गाडी हळू चालव म्हणताच तुफान राडा झाला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीने घरावर हल्ला करत संपूर्ण कुटुंबाला लोखंडी हत्याराने बेदम मारहाण केली. टोळीची दहशत पाहता कुटुंबाने स्वतःला तब्बल अर्धा तास घरात कोंडून घेतले होते. या प्रकाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
किरकोळ कारणातून मोठा राडा
टिटवाळा परिसरात किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला करत घराची तोडफोड केली आणि बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मोटारसायकल वेगात चालवल्याने वाद
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा आंबेकर चौक परिसरातील आर. के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. ५० वर्षीय तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. ३ मार्च रोजी ते आपल्या भावांसह घराबाहेर उभे असताना एक तरुण मोटारसायकल वेगात चालवत परिसरातून जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला येथून गाडी हळू चालवा असे सांगितल्याने वाद निर्माण झाला.
