‘बिबट नाही सांभाळता येत वाघाच्या कुठे नादी लगता तुम्ही’, श्रीकांत शिंदेंचा वनमंत्री नाईकांना टोला

 ‘लाडकी बहीण योजनेमुळं इतर खात्यांवर अन्याय होतोय’ असं म्हणत सरकारला घरचा आहेर देणाऱ्या गणेश नाईक यांना आता त्यांच्या या वक्तव्यासह त्यांच्याकडे असणाऱ्या वनविभागाच्या कारभारासंदर्भात थेट सवाल करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईत अभिनंदन मेळाव्यासाठी उपस्थित राहिले असता तिथं त्यांनी यासंदर्भातील वक्तव्य केलं.

राज्यातील वनविभागात नेमका काय प्रकार सुरू आहे याबाबत आपल्या कानावर आलं असून, त्यावर आपण फार काही बोलत नाही. मात्र, वनखात्याला पैसे कमी पडत असल्यामुळं आता सागाची झाड तोडायची म्हणतायत त्यातुन पैसे घ्यायचे म्हणतात, याची माहिती मिळवणं गरजेचं असल्याचं शिंदे म्हणाले.

बिबट्याची दहशत पाहता त्यासाठी जंगलात आधी शेळ्या सोडल्या जाणार होत्या, आता म्हणे फळझाडं लावू असं म्हणत बिबटे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे माहित करून घेत वनखात्याचा कारभार पाहावा असं खोचक स्वरात शिंदेंनी नाईकांना सुचवलं. ‘बिबट नाही सांभाळता येत वाघाच्या कुठे नादी लगता तुम्ही…’, असा टोला लगावत एकनाथ शिंदेंना निशाण्यावर घेणाऱ्या गणेश नाईक यांच्यावरच यावेळी श्रीकांत शिंदे यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.

जेवढं झेपत तेवढं बोललं पाहिजे

‘जेवढं झेपत तेवढं बोललं पाहिजे. कोत्या मनासारखं चाललाय सगळं मलाच मिळालं पाहिजे. युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं नाही पाहिजे’, असं म्हणत परिवहन खात्याचा विषय काढलात तर, एकनाथ शिंदे यांचं सगळ्यावर बारीक लक्ष असून इथे हुकूमशाहीचं राज्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे नाईकांना सुनावलं. नवी मुंबई मनपा जिंकली म्हणून काहीजण फुशारक्या मारत आहेत त्यांनी निसटता विजय मिळवला हे लक्षात ठेवावं, ‘हम हम है. बाकी सब पानी कम है’ अशा शब्दांत त्यांनी नाईकांना आव्हान दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *