आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत धरला ठेका; वरळीच्या होलिकोत्सवातील Video व्हायरल

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.  वरळी कोळीवाडा, माहिम कोळीवाडांसह ठिकठिकाणी आजपासूनच होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यातील होळीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वरळीकरांसोबत ठेकाही धरला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आह

संपूर्ण देशभरात होळी या सणाचे वेगळीच धुम असते. महाराष्ट्रात देखील विविध ठिकाणी होलिका दहन आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशातच आदित्य ठाकरे यांनी होळीनिमित्त वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ आदित्य ठाकरेंनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांची तसेच उबाठा समर्थकांच्या एकाहुन एक कमेंट येत आहेत.

आदित्य ठाकरेंची अधिकृत पोस्ट

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वरळी कोळीवाड्यातील होळीत सहभागी झाल्याचा आनंद त्यांच्या चहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.  जवळपास ते आमदार झाल्यापासून दरवर्षीच वरळीतील कोळी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यावेळी ते स्थानिकांसोबत पारंपरिक नृत्यात सहभागी होतात.

पारंपारिक गाण्यावर धरला ठेका

त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आदित्य ठाकरे हे वरळीतील कोळी बांधवांसोबत कोळी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंसोबत इतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते कार्यकर्तेही पारंपारिक गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला वरळीतील अनेक महिला आणि स्थानिक कोळी बांधव हे नाचताना दिसत आहेत.

दरम्यान कोळी बांधवांसाठी होळी हा अत्यंत उत्साहाचा आणि मोठा सण असतो. वरळीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा केला जातो. दरवर्षी वरळी कोळीवाड्यात हा उत्साह पाहायला मिळतो. सध्या आदित्य ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आदित्य ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *