Iran-Israel War चा परिणाम! सोन्यात 11 हजारांनी वाढ तर चांदीची 25 हजारांनी उसळी; आजचे दर पाहिले का?

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर शनिवारी केलेल्या हल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणवर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद पुढे संपूर्ण आखाती देशांमध्ये पसरले आहेत. अमेरिकने केलेल्या हवाई हल्ल्याच्या सूड उगवण्यासाठी इराणने आखाती देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे एअरबेस आहेत त्या देशांमधील तळावर हल्ले केले. इराणने युएई, बहरीन, इराक, कतारसहीत एकूण आठ देशांवर हल्ला केला. या युद्धाच्या झळका दुबईसारख्या अंतरराष्ट्रीय शहराला बसल्या आहेत. दुबईवरही इराणने ड्रोन हल्ले केले आहेत. त्यामुळेच दुबईमधील शेअर बाजार आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत. दुबईसारख्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरावर हल्ला झाल्याने जगभरामध्ये खळबळ उडाली असून या युद्धाचा परिणाम सोन्यावरही झाला आहे.

सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ?

अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धामुळे भारतातील सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे. भारतामधील सर्वात महत्त्वाच्या सोन्याच्या बाजारपेठांपैकी एक जळगावमध्ये आहे. अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं आणि चांदीच्या दरावर झालाय. सोन्या-चांदीच्या दरांवर मोठा परिणाम झाला आहे. अवघ्या 24 तासांमध्ये जळगावात सोन्याच्या दरात 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 25 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर पावणे दोन लाखांपर्यंत पोहोचले आहेत.

सोन्या-चांदीची किंमत किती झाली?

आजचा सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 75 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 3 लाख 3 हजार रुपये इतका आहे. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा उच्चांक झाल्याने मात्र ग्राहकांची चिंता वाढली असून सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा कोलमडला आहे. भविष्यात युद्धजन्य परिस्थिती जर राहिली तर सोने दोन लाख 50 हजार व चांदीच्या चार लाखापर्यंत होण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिक यांनी व्यक्त केलेली आहे.

शेअर बाजारामध्ये पडझड

इस्त्रायल-इराण युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. प्री ओपनिंगमध्ये भारतीय शेअर बाजार 7000 अंकानी कोसळला. निफ्टीमध्येही 170 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 2743 अंकांनी पडला आहे. म्हणजेच शेअर बाजारात 3.38% ची घसरण झाली असून बाजार 78543 अंकावर उघडला. तर निफ्टी 519 अंकांनी घसरला असून 2.06 टक्क्यांच्या घसरणीसहीत 24659 अंकांवर उघडला. बँक निफ्टी 1300  पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र पहिल्या सेशनमध्येच बाजार हजार अंकांनी सावरला. 1.21 टक्क्यांनी कसर भरुन काढत प्रत्यक्ष व्यवहार सुरु झाले तेव्हा बाजार 80282 अंकावर होता. निफ्टीही 300 अंकांनी वधारुन 24900 वर असताना व्यवहार सुरु झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *