मध्य पूर्वेत युद्ध सुरू झाले आहे आणि शेअर बाजार मोठ्या प्रमाणात विक्रीसह उघडला आहे. आठवड्याच्या शेवटी, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला, ज्यामुळे परिस्थिती युद्धापर्यंत पोहोचली. प्रत्युत्तर म्हणून, इराणने संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत आणि बहरीनसह आठ मध्य पूर्वेतील देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक प्रमुख इराणी नेत्यांच्या मृत्यूच्या बातम्या समोर आल्या, त्यानंतर अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त झालेले अलिरेझा अराफी यांनी सूड उगवण्याचा इशारा दिला आहे. वाढत्या तणावाच्या दरम्यान, इराणने जगातील सर्वात महत्वाचा तेल पुरवठा मार्ग मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनी बंद केला, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती जवळजवळ 8% वाढल्या आणि आठ महिन्यांच्या उच्चांकी $81 वर पोहोचल्या.
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाल्याच दिसत आहे. प्री ओपनिंगमध्ये 7000 अंकानी कोसळला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळलं आहे. जागतिक बाजारपेठेतील भावना अत्यंत खराब आहेत. निफ्टीमध्येही 170 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये 600 अंकांची घसरण झाली आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 2743 अंकांनी म्हणजेच 3.38% ने घसरून 78543 वर उघडला, तर निफ्टी 519 अंकांनी म्हणजेच 2.06% ने घसरून 24659 वर उघडला. बँक निफ्टी 1300 पेक्षा जास्त अंकांनी घसरला.
शेअर बाजार काही वेळातच सावरला. सेन्सेक्स 1000 अंकांनी किंवा 1.21 टक्क्यांनी घसरून 80282 वर वधारला आहे. तसेच निफ्टी 300 अंकांनी घसरून 24900 च्या खाली आला. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर युद्ध सुरूच राहिले तर ही घसरण आणखी होऊ शकते. कच्चा तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. एनटीपीसी, इंडिगो आणि लार्सन अँड टुब्रो सात टक्क्यांहून अधिक घसरले. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, ट्रेंड, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि मारुती सहा टक्क्यांहून अधिक घसरले. एटरनल, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील आणि आयटीसी चार टक्क्यांहून अधिक घसरले.
आशियाई बाजारपेठांमध्येही घसरण
आशियाई बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली. जपानचा निक्केई 2252.7 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 2.43टक्के घसरला. रविवारी यापूर्वी अमेरिकेतील फ्युचर्स एक टक्क्यांहून अधिक घसरले. एस अँड पी 500 आणि डो जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 1.11 टक्क्यांनी घसरले. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीही सात टक्क्यांहून अधिक वाढल्या आणि एका वर्षातील उच्चांक गाठला.
