प्रज्ञा पवारांकडून पुरस्कार परत, फडणवीसांना खुलं पत्र

प्रज्ञा पवारांकडून पुरस्कार परत, फडणवीसांना खुलं पत्र

देशातील असहिष्णु वातावरणाविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या प्रज्ञा पवार या पहिल्या मराठी साहित्यिक ठरल्या आहेत. याचा निषेध म्हणून त्यांनी आपले सर्व सरकारी पुरस्कार रक्कमेसह शासनाला परत केले आहेत.

भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मुल्यांवरच घाव घालण्याचा जो चौफेर प्रयत्न सुरु आहे त्याचा आपण निषेध करत असल्याचं पत्रही प्रज्ञा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं आहे.

देशातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचा विरोध म्हणून हिंदीसह अन्य भाषांतील अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार आणि पदांचा त्याग केला आहे. मात्र मराठीतील साहित्यिक अद्याप शांत होते. त्यामुळे प्रज्ञा पवारांच्या रुपानं निषेधाचा श्रीगणेशा झाल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *