लोखंडी सळई डोक्यात पडल्यानं तरुण जखमी; वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान घडली घटना

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मुलुंड इथं मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली, ज्यानंतर घाटकोपर इखं स्लॅबला मोठे तडे गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली. या घटनेतून मुंबईकर सावरत नाहीत तोच आणखी एका घटनेमुळं आता मुंबईतील नागरिकांच्या मनात रस्त्यावरून चालण्याचीसुद्धा भीती निर्माण होताना दिसत आहे. कारण, ठरत आहे ती म्हणजे आणखी एक भीषण घटना.

लोखंडी सळई कोसळून एकजण जखमी… 

मुंबईतील केईएम रुग्णालय परिसरामध्ये शनिवारी लोखंडी सळई डोक्यावर पडल्यामुळं एक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यानच KEM Hospital परिसरातून जात असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी सळई पडून त्या व्यक्तिचा जबर मार लागला. गंभीररित्या दुखापतग्रस्त झाल्यानं तरुणाला तातडीनं जवळच्याच रुग्णालयात दाखल करत तातडीनं त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मुंबईत विकासकामांदरम्यान स्लॅब, रॉड कोसळण्याच्या घटना पुन्हा भीतीदायकरित्या समोर येत असल्यामुळं संबंधित कंत्राटदार आणि कामगारांचा निष्काळजीपणा यात कारणीभूत असल्याची चर्चा पुन्हा जोर धरत असून, आता यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान परळमधील या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वर्दळीच्या परिसरांत घडणाऱ्या घटनांनी चिंतेत भर… 

लोखंडी सळई कोसळण्याची घटना ज्या परिसरात घडली, त्या मुंबईतील परळ भागात केईएम रुग्णालय, टाटा रुग्णाल, वाडिया रुग्णाल, केईएम हाडांचे रुग्णालय असून, इथं फक्त मुंबईत नव्हे तर देशाच्या विविध भागांतून येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असते. काही लहान मुलं, त्यांचे पालक याच रस्त्यानं इथं असणाऱ्या शाळांसाठी जात असतात. नोकरीपाण्यासाठी जाणाऱ्यांचाही या वाटेनं राबता असतो.

कायमच येथील रस्त्यांवर वाहनांची आणि ये- जा करणाऱ्यांची गर्दी असते. अशाच स्थितीत इथं विकसनशील प्रकल्पांच्या बांधकामांअंतर्गत अशा घटना घडणार असतील तर, सामान्यांना रस्त्यांवर चालणंसुद्धा सुरक्षित भासणार नाही अशीच स्थिती उद्भवत असून अनेकांच्याच मनात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी मुंबईत जगणं खरंच धोक्याचं झालं आहे का? प्रशासन या समस्यांकडे कधी लक्ष देणार? सामान्यांचा विचार कधी केला जाणार? हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित होत असून, प्रशासन यास उत्तर देण्यास आणि या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कारवाई करण्यास बांधिल आहे हाच नागरिकांचा सूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *