गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये असणारी तणावाची स्थिती आता विकोपास गेली असून, इस्रायलनंही या वादात उडी घेत इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक ठिकाणी भीषण मिसाईल हल्ले केले. इस्रायलनं इराणवर मोठा हवाई हल्ला केला असून इराणची राजधानी तेहरानमध्ये हे हल्ले करण्यात आले. प्राथमिक वृत्तानुसार इराणमध्ये तीन मोठे हल्ले झाले आणि त्यानंतर इराणनंही प्रत्युत्तराची कारवाई सुरू केल्यानं इस्रायलमध्ये युद्धाचे सायरन वाजवण्यात आले. युद्धाचं सावट पाहता इराणचं वायुदल तळ तातडीनं रिकामं करत इस्रायलच्या हल्ल्याचा उत्तर देण्यात आलं. तर, नागरिकांना इराणनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं.
इस्रायलमध्येसुद्धा आणीबाणी जाहीर
हल्ल्याच्या इशाऱ्यामुळे इस्रायलमध्येसुद्धा आणीबाणी जाहीर करण्यात आली असून, सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. इस्रायलमधील सर्व नागरिकांना घरातून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. शनिवारी इराणच्या राजधानीत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ एक मोठा हल्ला झाला. सरकारी टेलिव्हिजनने कार्यालयांच्या परिसरात स्फोट झाल्याचे कबूल केल्याचं वृत्त AP नं प्रसिद्ध केलं. दरम्यान, इराकमध्येसुद्धा या तणावाचे आणि हल्ल्यांचे पडसाद उमटण्याची चिन्हं असल्यानं या देशातसुद्धा हवाई क्षेत्र तातडीनं बंद करण्यात आलं.
इराणच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयावर हल्ला
इराणच्या गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयावर हल्ला केला असून इराणच्या 6 शहरांवर इस्रायलचे हल्ले. इश्फहाम, कोम कराज, तबरीज, तेहरान या शहरांवर इस्रायलचे हल्ले झाले असतानाच ‘या युद्धाचा शेवट आता तुमच्या हाती नाही, युद्ध सुरू तुम्ही केलंय ते संपवू आम्ही’ , इराणच्या राष्ट्रीय संरक्षण यंत्रणेकडून सज्जड इशारा जारी.
ऑपरेशन शिल्ड ऑफ जुदाह
इस्रायलनं इराणवर केलेल्या या भयंकर कारवाईला ‘ऑपरेशन शिल्ड ऑफ जुदाह’ असं नाव देण्यात आलं. असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या राजधानीत हा हल्ला सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ झाला.इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, “इस्रायल राज्याला धोका टाळण्यासाठी” इस्रायलने हा हल्ला केला. इस्रायलमध्ये सायरन वाजताच, इस्रायली लष्कराने सांगितले की, “इस्रायल राज्यावर क्षेपणास्त्र डागण्याची शक्यता असल्याने जनतेला तयार करण्यासाठी त्यांनी सक्रिय इशारा जारी केला आहे.”इस्रायलच्या विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले की सर्व नागरी उड्डाणांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे आणि नागरिकांना विमानतळ टाळण्याचे आवाहन केले आहे.
