कोकणातील खाडी पूल प्रकल्पांची विशेषतः रेवस-करंजा आणि कोस्टल हायवेवरील 7 मुख्य पूल माहिती आणि त्यांचे फायदे समजून घेणार आहे. यामुळे कोकणपर्यंतचा प्रवास चांगला होणार आहे. प्रमुख प्रकल्प असलेला रेवस-करंजा पूल फायदेशीर ठरणार आहे. रेवस-करंजा खाडी पूल हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील उरण (करंजा) आणि अलिबाग (रेवस) यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. धर्मतर खाडीवर सुमारे 2.04 किमी लांबीचा मुख्य पूल आणि एकूण 10.65 किमीचा रस्ता मार्ग हा आहे. या प्रकल्पासाठी 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचे सुमारे 25% काम पूर्ण झाले असून, मार्च 2028 पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
कोकणाला होणारे फायदे
- वेळेची मोठी बचत होणार आहे. मुंबई (दक्षिण मुंबई) ते अलिबाग हे 2.5 तासांचे अंतर केवळ 1 तास 15 मिनिटांवर येईल.
- कोकणवासीयांचे प्रवासाचे अंतर कमी होणे. जेएनपीटी (JNPT) ते अलिबाग हे 55 किमीचे अंतर कमी होऊन ३० किमीवर येईल. पर्यटनाला चालना मिळणार आहे. रेवस-रेडी सागरी महामार्गावरील पुलांमुळे पर्यटकांना कोकणातील नयनरम्य किनारपट्टीवर प्रवास करणे सोपे होईल, ज्यामुळे स्थानिक पर्यटनात वाढ होईल.
- विमानतळाशी कनेक्टिव्हिटी वाढणार. या पुलामुळे कोकणातील लोकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदरापर्यंत थेट आणि जलद प्रवेश मिळेल.
- बारामाही प्रवास होणार सुखकर. पावसाळ्यात खाडीतील बोट सेवा बंद असते, तेव्हा या पुलामुळे प्रवाशांना कोणताही अडथळा न येता प्रवास करता येईल.
- आर्थिक विकास: वाहतूक सुलभ झाल्यामुळे कृषी उत्पादने (उदा. हापूस आंबा, मासे) बाजारपेठेत लवकर पोहोचतील आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळेल.
इतर महत्त्वाचे प्रकल्प
सागरी महामार्गावरील 7 पूल: रेवस ते रेडी या 498 किमीच्या सागरी महामार्गावर रेवस-करंजासह एकूण ७ मोठे खाडी पूल उभारले जात आहेत. आगरदांडा ते दिघी: हा पूल अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यांना जवळ आणेल. तिसरा वाशी खाडी पूल: यामुळे मुंबई-पुणे आणि मुंबई-कोकण मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
