प्रत्येकाला वाटतं आपलं हक्काचे घर असावं. पण गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या वाढलेल्या किंमतीमुळे घर घेणे हे सर्वसामान्याच्या आवाका बाहेर गेलं आहे. अशात राज्य सरकारकडून प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईनंतर नवी मुंबईचा मोठ्या झपाट्याने विकास होतोय. नवी मुंबईतील बेलापूरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला हिरवा कंदील मिळणार असून पात्र 72 कुटुंबांना आता त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. इतर रहिवाशांनाही नाराज होण्याची गरज नाही कारण त्यांनाही घरं मिळणार आहे. पण त्यांना यासाठी फक्त 2.5 लाख मोजावे लागणार आहे.
गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक घेण्यात आली. ज्यात पंकज भोयर यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. तर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या प्रकल्पाबद्दल जाहीर केलं. त्या म्हणाल्यात की, बेलापूर मतदारसंघातील 72,665 कुटुंबांच्या आयुष्यात आता ‘अच्छे दिन’ लवकरच येणार आहेत.
नवी मुंबईत 72 हजार घरं आणि ती ही अगदी Free…
राज्य सरकारने बेलापूर मतदारसंघातील झोपडीधारकांसाठी दोन मुख्य श्रेणी निश्चित केल्या आहेत. 72,665 कुटुंबांना पूर्णपणे मोफत घरं मिळणार आहे. तर बाकी लोकांना सवलतीच्या दरात घर मिळाली आहेत. मोफत घरं हे ज्या झोपडीधारकांचं पुरावे सन 2000 पूर्वीचे आहेत, त्यांना हक्काचे घर मोफत राज्य सरकार देणार आहे. तर जे कुटुंब 2000 ते 2011 या कालावधीतील आहेत, त्यांना राज्य सरकार फक्त 2.5 लाखांमध्ये घर देणार आहेत.
या प्रकल्पासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व पात्र झोपडीधारकांचे बायोमेट्रिक आणि डीएसआर (DSR) तयार करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार तुर्भेमधील शिवाजी नगर भागात ‘जीबीआर’ प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आला आहे. ही प्रक्रिया आता प्रगत टप्प्यावर पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय या योजनेचा लाभ कसा घ्यावा, यासाठी राज्य सरकार लवकरच नागरिकांसाठी मोठा मार्गदर्शन मेळावा आयोजित करणार आहे.
लाभार्थी कोण पाहिलं का?
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नवी मुंबईतील तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे, असं मंदा म्हात्रे यांनी सांगितलं. शहराच्या नियोजित विकासामध्ये या प्रकल्पामुळे नवी मुंबईचे रूप पालटणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
