बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस, पण महाराष्ट्रात तापमान वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात काही दिवसांपासून थंडी ओसरली आहे. अनेक भागांत आता उन्हाचा कडाका वाढवला असल्याचं जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या आठवड्यात दिलेल्या पावसाच्या अलर्टचं संकट आता टळलं आहे. आज, शुक्रवारी, 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील हे जाणून घेऊया.

मुंबईत कसं असेल हवामान?

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस तापमानचा पारा चढत आहे. सध्या किमान तापमानातही काही अंशांनी वाढ झाल्याचं हवामान विभागानं नोंदवलं आहे. शहरात आज दिवसभर हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. शिवाय कोकण किनारपट्टीवर वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत आज दिवसभर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *