धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आंबे या गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसर हादरवून टाकणारी ठरली आहे. एका विवाहित महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. घरामध्ये आई आणि दोन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भारती संजय पावरा (वय 30) या आपल्या राहत्या घरी दोन मुलांसोबत आढळल्या. घरात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर तिघांनाही तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर भारती पावरा आणि त्यांचा 3 वर्षांचा मुलगा चिराग संजय पावरा यांना मृत घोषित करण्यात आले. तर 5 वर्षांचा मोठा मुलगा रियांश संजय पावरा गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
