महाराष्ट्रात दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमींसाठी हा दिवस एका सणाप्रमाणेच आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, मुंबई-दादर अशा अनेक ठिकाणी शिवजयंती धामधुमीत साजरी केली जाते. दरम्यान 2023 पासून आग्र्यामध्येही शिवजयंती साजरी केली जाते. आग्र्यासारख्या शहरातही शिवजयंती साजरी केली जाते हे आश्चर्यकारकच आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, आग्र्यामध्ये शिवजयंती का साजरी केली जाते? चला तर मग जाणून घेऊया.
परवानगीसाठी शिवप्रेमींचे अथक प्रयत्न
पूर्वी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास नकार दिला जात असे. यावेळी इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी आहे मग, शिवजयंतीबाबत हा भेदभाव का? असा प्रश्न तेथील संतप्त शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात होता. याबात पुरातन खात्याकडून परवानगी मिळावी यासाठी तेथील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022 पासूनच प्रयत्न सुरू होते. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांचा प्रमुख पुढाकार होता.
मराठ्यांच्या इतिहासीतील एक अनन्यसाधारण घटना
वेळोवेळी प्रयत्न करूनही पुरातत्व खात्याकडून आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली जात नव्हती. पर्यायी संतप्त शिप्रेमींनी दिल्ली उच्च न्यालयात धाव घेतली. त्यानंतर अखेर पुरातत्व खात्याकडून ही परवानगी मिळाली.
सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी औरंगजेबाने याच आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यावेळी त्याने महाराज आणि युवराज या दोघांनाही मारण्याचा कट रचला होता. पण औरंग्याचा हा डाव मोडून मोठ्या हुशारीने शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुखरूप सुटका करून घेतली.
आग्रा किल्ल्यावर ‘शिवप्रताप दिन’ म्हणून साजरी केली जाते शिवजयंती
मराठ्यांच्या इतिहासातील या घटनेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या किल्ल्यामध्ये ‘शिवप्रताप दिन’ म्हणून शिवजयंती साजरी केली जावी अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती. त्यांची ही इच्छा अखेर पूर्ण झाली आणि 2023 साली पहिल्यांदाच आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली गेली. गेल्या 3 वर्षांपासून आग्रा किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. याहीवर्षी किल्ल्यावर सकाळी 6 वाजल्यापासूनटच उत्सवाला सुरूवात झाली. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अभिमानाची गाणी आणि नाटके सादर केली गेली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांच्यासह राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल, महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.
