इंदापुरातील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला धक्कादायक वळण; 21 वर्षीय तरुणी आणि आरोपी महिनाभरापासून…

आईसोबत दुचाकीवरून निघालेल्या मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून 21 वर्षीय तरुणीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची घटना भिगवण येथे मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असताना या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण झाल्याचा दावा करण्यात येत असलेली 21 वर्षीय तरुणी आणि आरोपींमध्ये महिनाभरापासून संभाषण सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तसंच या दोघांमध्ये महिनाभरापासून फोनवर बोलणं सुरू होतं, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे अपहरण झालेली तरुणी आणि आरोपींचे घर शेजारीच होते. त्यामुळे हे अपहरण आहे की प्रेमप्रकरणातून ही घटना झाली, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भिगवणमधून काल मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका 21 वर्षीय तरुणीचं दोन तरुणांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली. या घटनेप्रकरणी दोघा जणांविरोधात भिगवण पोलिसात अपहरणाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जहीर हारुन शेख आणि आयान हारुन शेख (दोघे रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. भिगवण येथील अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे पाच दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते.

अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजारी-शेजारी आहे आणि दोघांमध्ये एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं ,अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दोघांचेही फक्त 1 महिन्याचे डिटेल्स मागवले होते, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *