गँग रेप करुन महिलेची हत्या? रात्री बळजबरीने रिक्षात बसवलं अन्…

पुण्यात एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भारती विद्यापीठाजवळ हा सारा धक्कादायक प्रकार घडला आहे. मयत महिलेवर आधी अत्याचार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून देण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींपैकी एकाने महिलेला खाणीत धक्का देत तिचा खून केल्याची माहिती मिळत आहे. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेले. तिथे तिला काठीने मारहाण केली आणि नंतर एकाने तिला खाणीत ढकलून दिले.  सीसीटीव्हीमध्ये आपण ओळखले जाऊ नये म्हणून आरोपींनी रिक्षाचे हूड देखील बदलले होते. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा दोघांनी तपास केला आणि अखेर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं अब्दुल मोहम्मद शेख, सोहेल हकीक खान अशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *