जिल्हा परिषदेवर झेंडा कुणाचा? आज फैसला; सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. एकूण २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीत किती टक्के मतदान होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने रविवारी ही अंतिम आकडेवारी जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *