5 वर्षाच्या मुलाने प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नंतर…; कोर्टाने आईला सुनावली जन्मठेप

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्याच पाच वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. कोर्टाने याप्रकरणी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 28 एप्रिल 2023 रोजी घडली. पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंग राठोड यांची पत्नी ज्योती राठोडचे तिचा शेजारी उदय इंदोलियासोबत अनैतिक संबंध होते. पोलिसांनी सांगितलं की, ज्योतीचा मुलगा जतीन याने आपल्या आईला उदयसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होते.

जतीन आपण पाहिलेली गोष्ट त्याच्या वडिलांना सांगेल या भीतीने ज्योतीने एक भयानक पाऊल उचलले. तिने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला एका दोन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकलं. जतीन गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात त्याने मृत्यूशी झुंज दिली, मात्र 24 तासांच्या आत त्याचा मृत्यू झाला.

हत्या नसून अपघात असल्याचा समज

सुरुवातीला, जतीनचा मृत्यू छतावरून पडून झालेल्या अपघातामुळे झाला असं मानलं गेलं. पण सत्य जास्त काळ दडपून राहू शकलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं. गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसांनी ज्योती पूर्णपणे खचली आणि तिने ध्यानसमोर आपला गुन्हा कबूल केला.

आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर काहीतरी भयंकर चुकीचं घडलं आहे, असा संशय ध्यान यांना आधीच येऊ लागला होता. त्याने कथितरित्या अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ संभाषणे रेकॉर्ड केली, ज्यात ज्योतीने काय घडलं हे कबूल केलं, आणि त्याने आपल्या घरात लावलेल्या कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले. या दोषी ठरवणाऱ्या पुराव्यांसह ध्यान यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली.

ज्योतीच्या प्रियकराला आरोपी बनवण्यात आलं, पण नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ज्योती आणि तिचा प्रियकर उदय यांना आरोपी केलं. तपासानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ज्योतीला दोषी ठरवलं आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तथापि, उदयविरुद्ध पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

थाटीपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कमल किशोर यांनी सांगितले की, पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीसह तपासादरम्यान पत्नीची भूमिका समोर आली.

सरकारी वकील धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने ज्योतीला दोषी ठरवण्यासाठी परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून राहिले, तर दुसऱ्या आरोपीला संशयाचा फायदा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *