गणेश नाईकांना मतदान केंद्रच सापडेना! शिंदेंवर संतापून म्हणाले, ‘काही लोकांच्या झोपा…’

राज्यातील महानगरपालिका निवडणुकींची घोषणा झाल्यापासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचं विशेष लक्ष असण्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यात उडालेले खटके. टांगे पलटी घोडे गायब अशी टीकाही गणेश नाईक यांनी शिंदे पिता-पुत्राला इशारा देताना केली. इथे भाजपा आणि शिंदेंंची शिवसेना एकमेकांविरुद्ध लढत असल्याने दोन्ही बाजूने निडवणूक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे. अशातच आत मतदानाच्या दिवशीही नवी मुंबईत गोंधळ दिसून आला.

गणेश नाईकांसोबत नक्की घडलं काय?

राज्याचे वनमंत्री मतदानासाठी पोहोचले असता. त्यांना मतदानकेंद्रच सापडत नव्हतं. गणेश नाईक आधी सेंट मेरी शाळा येथे आले असता मतदान येथे नसल्याचे सांगण्यात आले. तेथून गणेश नाईक मनपा सीबिएसई शाळेत आले असता येथून पुन्हा त्यांना सेंट मेरी शाळेतच मतदान असल्याचे सांगण्यात आले. या साऱ्या प्रकारामुळे गणेश नाईक चांगलेच संतापले. निवडणूक आयोगाचे नियोजन नाही, असं म्हणत नाईक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. “आम्हाला धावायला लागत आहे तर सामान्यांचे आज काय हाल होतील?” असा सवाल नाईक यांनी विचारला.

शिंदेवर साधला निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानाच्या आदल्या रात्री अचानक नवी मुंबईत दाखल झाले. नवी मुंबईतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी देत शहरात दाखल झाले. काल रात्री वाशी, घणसोली तसेच आज ऐरोली येथे घडलेल्या शिवसेना-भाजपा वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत गेल्याचं सांगण्यात आलं. रात्री त्यांनी उमेदवारांची भेट घेतली. मतदानाच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गांच्या नवी मुंबई भेटीने राजकीय वातावरण तापले आहे. असं असतानाच यावर आज सकाळी गणेश नाईक यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. “काही लोकांच्या झोपा खराब झाल्यात म्हणून ते शैतानासारखे भटकतायत,” असं म्हणथ गणेश नाईकांचा एकनाथ शिंदे यांच्या रात्रीच्या दौऱ्यावर कठोर शब्दात टीका केली.

आज कुठे कुठे मतदान?

बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *