आता घरी बसायचं…माझ्यानंतर…’, राणेंकडून राजकीय निवृत्तीचा ‘ना.रा.’; जाहीर सभेत काय घडलं?

कोकण… महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींचं एक क्षेत्र आणि नारायण राणेंचा बालेकिल्ला. मात्र याच कोकणातील एका सभेदरम्यान नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जिथं त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. सिंधुदुर्गात कणकवली इथं झालेल्या जाहीर सभेत राणेंनी जणू राजकारणातून निवृत्तीच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू असल्याचं सुचित केलं.

आपण आता ठरवलंय, आता घरी बसायचं’ असं राणे म्हणाले. नगरपंचायत निवडणुकीनंतर राणे सिंधुदुर्गात आले, जिथं भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राणेंचं जंगी स्वागत केलं. यावेळी राणे समर्थकांनी एक जल्लोष केला. याच सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करतानाच भाषणामधून राणेंनी आपल्या राणेंनी वक्तव्याचा ओघ हा राजकीय निवृत्तीच्या दिशेनं वळवला.

काय म्हणाले राणे? 

‘नारायण राणे आजही रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या आणि काळी काच असणाऱ्या गाड्या घालून काहीजण येतात. माझ्या गाडीला काळी काच नाही. माणुसकीच माझा धर्म आहे. माझ्या आड अनेकजण आले पण आज त्यावर नाही बोलणार. मला तेव्हाही अडचणी आल्या आणि आताही येतात. राजकारणात कटकारस्थानं सुरुयेत. त्यामुळं आपण आता ठरवलंय घरी बसायचं…. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे! चांगलं ते जोपासा’, असं राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *