कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गर्दीची लाट उसळली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गत पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. 2025 या वर्षाला निरोप आणि नाताळचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणात पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांची संख्या आता वाढताना दिसत आहे. कुटुंब, मित्र मैत्रिणीचा ग्रुप सध्या कोकणात दाखल झालेले दिसून येतात. त्यामुळे सध्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गजबजाट दिसून येतो. इथं आल्यानंतर फिरण्याच्या ठिकाणांपासून ते अगदी खाण्यापर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन पर्यटकांनी केले आहे. यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळत आहे.
पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नाताळ आणि त्यानंतर येणारे नववर्ष यासाठी पर्यटकांनी तळकोकणाला पसंती दिलीय. नववर्ष स्वागतासाठी आतां अवघे काही दिवस उरले असल्याने मालवण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळासोबत समुद्री पर्यटनाचा व समुद्री सहसी खेळांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गणपतीपुळे, भाट्ये, मांडवी या समुद्र किनाऱ्यासह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. कास पठार भागात आढळलेले बाराशिंगे हरण
जागतिक वारसास्थळ असलेले कास पठार भागात हरिण प्रजातीतील सांबराचा वावर आढळून आला आहे.हरिण प्रजातीतील सांबर, काळवीट आणि बाराशिंगा आदी मोठ्या आकाराचे प्राणी असून, कासवर आढळलेल्या या सांबराच्या शिंगांनाही अनेक फाटा होत्या. कुसुंबीमुरा, एकीव आणि कास परिसरात हे सांबर एका व्यक्तीला दिसले त्यानंतर याचे मोबाईल वर चित्रीकरण केले.हरणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरिण आहे. या हरणाची शिंगे हे याचे वैशिष्ट्य आहे. १२ किंवा त्याहीपेक्षा जास्ती टोके शिंगांना असतात म्हणून यांना मराठी आणि हिंदीमध्ये बाराशिंगा असे म्हणतात.
