महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या २८-२९ जुलै रोजी पुण्यात पार्थ पवार यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. पार्थ हे त्यांची मैत्रीण कायनात धार हिच्यासोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत.
रेवती सुळेंच्या लग्नात एन्ट्री
नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत पारंपरिक पोशाखात दिसलेली एक तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. ती तरुणी म्हणजेच कायनात धार. काही दिवसात कायनात ही पवार कुटुंबाची सूनबाई होणार आहे.
