तब्बल 16 दिवस बँका बंद! पाहा जानेवारीतील Bank Holiday List, शेअर बाजारालाही 9 दिवस टाळं

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांसंदर्भात तुमची काही कामं असतील तर त्यांची पूर्व तयारी आताच करुन ठेवा कारण वर्षाचा पहिलाच महिना सुट्ट्यांचा असणार आहे. बँका आणि शेअर बाजार किती दिवस बंद असणार आहेत याचा तपशील समोर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी 2026 मध्ये देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 16 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.  रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाने जारी केलेल्या ताज्या कामकाज कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारव्यतिरिक्त एकूण 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहतील.

बँका बंद तरी या सेवा सुरु

मात्र या सुट्टीच्या दिवसांमध्ये ग्राहकांना बँकांच्या सुट्ट्या असूनही ऑनलाइन बैंकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करता येतील. बँकांच्या ऑनलाइन सुविधांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.
अशा परिस्थितीत, जर पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाची काम असेलेल्यांनी महिन्यातील सुट्टया लक्षात ठेवाव्या लागतील. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी बँका कधी-कधी बंद राहतील हे पाहूयात..

कोणत्या दिवशी बँका राहणार बंद

1 जानेवारी : नवीन वर्ष दिवस /9आयझॉल, चेन्नई, गंगटोक, इंफाळ, इटानगर, कोहिमा, कोलकाता, शिलाँग येथे बँका बंद.)
2 जानेवारी: नवीन वर्षाचे उत्सव / मन्नम जयंती (आयझॉल, कोची, तिरुवनंतपुरम,)
3 जानेवारी: हजरत अली यांचा जन्मदिन (लखनऊ येथील बँका बंद.)
12 जानेवारी: विवेकानंद जयंती – (कोलकाता)
14 जानेवारी: मकरसंक्रांती/बिहू – (अहमदाबाद)
15 जानेवारी: उत्तरायण शुभ काळ/पोंगल /माघे
संक्रांती / मकरसंक्राती – (बंगळुरू, चेन्नई, गंगटोक हैदराबाद, विजयवाडा.)
16 जानेवारी : तिरुवल्लुवर दिवस – (चेन्नई)
17 जानेवारी : उझावर धिरुनल – (चेन्नई)
23 जानेवारी : सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस/सरस्वती पूजा (श्री पंचमी) / बसंत पंचमी- (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता.)
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन : (भोपाळ, सर्वत्र. चंदिगड, डेहरादून, कानपूर, श्रीनगर वगळता)

शेअर बाजारातही 9 दिवस ट्रेडिंग बंद

जानेवारी 2026 मध्ये शेअर बाजारात 9 दिवस ट्रेडिंग होणार नाही. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 4 रविवार आणि 4 शनिवारव्यतिरिक्त 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रेडिंग बंद राहील. म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये 31 पैकी 22 दिवस शेअर बाजार सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *