‘रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’, उशिरा पोहोचल्यानं नातेवाईकांमध्ये बेदम मारहाण; कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत काल बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रक्षाविसर्जनासाठी जमलेल्या नातेवाइकांत क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. ‘रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ या प्रश्नावरून सुरू झालेला वाद क्षणात वाढत गेला आणि तिरडीच्या काठ्यांनी झालेल्या मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेत इचलकरंजी येथील चौघेजण गंभीर जखमी झाले असून स्मशानभूमीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

या झटापटीत विकास रामचंद्र गेजगे (वय 55), निवास रामचंद्र गेजगे (वय 50), सुनंदा दगडू पारसे (वय 65) आणि पूजा दगडू पारसे (वय 35, सर्व जखमी रा. इचलकरंजी) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

रक्षाविसर्जनासाठी उशिरा आल्यानं वाद

गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे (वय 60, रा. जरगनगर) यांचे 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी निधन झाले होते. मंगळवारीच त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. बुधवारी सकाळी सुमारे 11.15 वाजता रक्षाविसर्जनासाठी इचलकरंजीहून त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक आले. त्यावेळी मृत करडे यांच्या नणंदेच्या मुलांनी आणि काही नातेवाइकांनी ‘रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ अशी विचारणा केली. यावरून वाद निर्माण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *