अमिताभ अचानक स्मशानभूमीत पोहोचले, घरुन रुग्णवाहिका…; मुखाग्नीआधी नाट्यमय घडामोडी

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. ते 89 वर्षांचे होते. मात्र धर्मेंद्र यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्याऐवजी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी पहिल्यांदा समोर आली. प्रकृतीच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र अचानक आज सकाळी एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निधनाच्या चर्चांना  उधाण आलं. अखेर रुग्णावाहिका आणि धर्मेंद्र यांचं संपूर्ण कुटुंब विलेपार्ले स्मशानभूमीत पोहचल्यानंतर वृत्तावर शिक्कामोर्तब झालं.

सकाळपासून काय काय घडलं?

सकाळी अचानक धर्मेंद्र यांच्या मुंबईतील निवासस्थानामधून रुग्णवाहिका बाहेर पडली.  त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर त्यांचं निधन झाल्याची शक्यता काही प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली. दरम्यान ही रुग्णवाहिका घरातून निघाल्यानंतर अचानक धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल पवन हंन्स स्मशानभूमीत पोहोचली. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची जोरदार चर्चा सुरु झाली. ईशापाठोपाठ अभिनेता अमिर खान, ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्माही स्मशानभूमीमध्ये पोहचले. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त चर्चेत असतानाच अचानक प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी धर्मेंद्र यांच्या घरातून निघालेल्या रुग्णवाहिकेच्या समोरील बाजूस चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या हातात अत्यंसंस्काराच्या साहित्य दिसत होतं. त्यामुळे धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं आणि त्या रुग्णवाहिकेतून त्यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेलं जात असल्याचं सांगण्यात आलं. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही कारने विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पोहोचले.

रुग्णालयात उपचार, डिस्चार्ज

धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरीच त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं. धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम करत एक मोठा वारसा मागे सोडला आहे.  ‘इक्किस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 25 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं आहेत. सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता अशी त्यांना सहा मुलं आहेत.

300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. चाहते त्यांना प्रेमाने गरम-धरम म्हणतात. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची रेस्तराँ चैन आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेल आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *