सोळा सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमात गेलेले, घरी परतताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; रत्नागिरीत खळबळ

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बंडगर तालुक्यात शिरगाव येथे वॅगनार कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दापोली तालुक्यातील राजापूर येथील शंकर करमरकर (वय 50) आणि हर्षदा जोशी (वय 70, राहणारे टिळक आळी रत्नागिरी) या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

व्हॅगनार कारमधून हे नाशिक येथे गेले होते. नाशिक येथून दापोलीकडे परतत असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. दापोली तालुक्यातील केळशी येथील असलेले प्रमोद मुकुंद लिमये (वय 60), ओंकार प्रमोद लिमये (वय 35) हे दोघेजण या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे सगळे नाशिक येथे गेले होते. नाशिक येथे नातेवाईकांकडे सोळा सोमवारच्या व्रताचे उद्यापन करुन हे पुन्हा कोकणात गावी येत असताना मंडणगड शिरगाव परिसरात हा भीषण अपघात झाला. दोन जखमींना तातडीने महाड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी (18 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात झाल्याचं कळताच ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मंडप जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तपासून शंकर आओणि हर्षदा यांना मृत घोषित केलं. तर, इतर जखमी दोघांवर उपचार सुरु आहेत. मंडणगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मंडणगड पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेले शंकर करमरकर हे दापोली जालगाव परिसरात एक खाजगी नोकरी होते. ते येथील एका लग्नाच्या हॉलमध्ये आचारी अशा स्वरूपाचं काम करत असत. तर ते चालक म्हणूनही काम करत होते. ते विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक 14 वर्षाचा मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे शंकर करमरकर यांच्या मृत्यूने कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. शंकर करमरकर हे मूळचे दापोली तालुक्यातील देहेण राजापूर येथील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *