पुण्यामध्ये भरदिवसा आणखी एक थरारक हत्या करण्यात आली आहे. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यावेळी कोयत्याने हल्ला करत या तरुणाला संपवलं आहे. या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी टोळी युद्धातून एकाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात सध्या काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यात सध्या पोलिसांचा वचक राहिलाय का असा प्रश्न उभा राहतो आहे. त्याच कारण म्हणजे पुण्यामध्ये आज दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयंक खराडे असं या हत्येत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या हत्येच कारण अजून समोर आलेलं नाही, पण दोनचं दिवसांपूर्वी पुण्यात टोळी युद्धाच्या पार्श्वभूमितून एकाची हत्या झाली होती.
दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाची गोळ्या झाडून भयंकर हत्या करण्यात आली होती. दिवसेंदिवस पुण्यातील टोळीयुद्ध थांबायचं नाव घेत नाही. पुणे पोलिस सांगत आहेत की आम्ही पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
