ठाण्याहून कोकणात सुट्टीला गेल्या, तिघी बहिणींसह जिजूंचा आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

रत्नागिरी  शहराजवळील आरे वारे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील चौघा जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी प्रसंगाने शेख आणि काझी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मुंबई-ठाण्यातील दोन सख्ख्या बहिणी रत्नागिरीतील तिसऱ्या बहिणीकडे गेल्या होत्या. सगळे जण समुद्रावर फिरण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघी जणी आणि एकीचा पती असे चौघे जण बुडाले. या दुर्घटनेत शेख कुटुंबाने तीन मुली गमावल्या, तर काझी यांच्या कुटुंबातील चिमुकल्याने आपले आई-वडील गमावले आहेत.

या दुर्दैवी घटनेत तीन सख्ख्या बहिणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर शेख कुटुंबाचे जावई असलेले रत्नागिरी ओसवालनगर येथील काझी यांचाही या घटनेत मृत्यू झाला. सुट्टीनिमित्त ठाण्यातील दोघी बहिणी कोकणात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आल्या होत्या. मात्र ही सुट्टी त्यांच्या जीवनाची अखेर करणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *