मुंबईच्या पूर्व उपनगरात एका 11 वर्षांच्या मुलावर पिटबुल प्रजातीच्या श्वानाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना एका व्हिडिओत कैद झाली आहे. तर मुलगा रिक्षात घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर कुत्रा त्याच्याच बाजूला बसलेला आहे. तर कुत्र्याचा मालक रिक्षाच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असताना त्याच्या या अवस्थेवर तो हसताना दिसत आहे.
मानखुर्दमध्ये ही घटना घडली आहे. माथेफिरुने अल्पवयीन मुलीला पाळीव श्वानची भीती दाखवत माथेफिरुने श्वान त्याच्या अंगावर सोडले. श्वानाने त्याच्यासमोरच मुलाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी मोहम्मद सोहेल हसन खान विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीतील हमजा हलीम खान यांचा मुलगा हमजा हा कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. 17 जुलै रोजी ही घटना घडली होती. 10 वाजता हमजा परिसरात खेळत असताना एका रिक्षात बसला. त्याच रिक्षात मोहम्मद याचा पाळीव श्वान घेऊन बसला. तो मुद्दामून त्या श्वानाला मुलावर सोडत होता. त्याचवेळी अचानक श्वानाने त्याच्या हनवटीवर चावा घेतला. त्यानंतर श्वान सातत्याने त्याच्यावर हल्ले करत होता. तेव्हा घाबरून मुलाने तिथून पळ काढला. मात्र तेव्हा तो श्वानदेखील त्याच्या मागे धावला.
मुलगा जखमी झाला असून घाबरलेल्या अवस्थेत त्याने त्याच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने पतीला बोलून घेतले. त्यांनी लगेचच पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी मोहम्मद हा त्यावेळी दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे. तसंच, तोदेखील त्याच परिसरात राहतो. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या आजूबाजूलाही काही लोकांच्या हसण्याचा आवाज येत आहे.
