या मायानगर असंख्य लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. आजही इथे अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. नोकरीसोबत आपलं एक छोटंस का होई ना घर असाव हे सर्वांना वाटतं. मुंबईतील घरांची किंमत दिवसेंदिवस आकाशाला भडत आहे. मुंबईतील एंटीलिया हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं घर असून 27 मजली ही इमारत आहे. पण सध्या दक्षिण मुंबईतील वरळीमधील समुद्रासमोरील दोन लक्झरी डुप्लेक्स फ्लॅटच्या विक्रीची सर्वत्र चर्चा होते आहे. कारण या घराचा व्यवहार हा मुंबईतील नाही तर देशातील सर्वात महागड्या निवासी मालमत्तेचा आहे.
हे घर नाही तर ताजमहाल!
दक्षिण मुंबईतील वरळीमधील सी फेस आला असलेले दोन लक्झरी डुप्लेक्स फ्लॅट्सच्या विक्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रत्यक्षात खरेदीदाराने या दोन फ्लॅटसाठी एकूण 703 कोटींची किमंत मोजली आहे. तर फ्लॅटच्या नोंदणीसाठी फक्त 63.9 कोटी रुपये खर्च झाले. वरळी सी फेसमधील नमन झना या इमारतीतील हे दोन फ्लॅटसाठी ही किंमत देण्यात आली आहे. या 40 मजली इमारतीच्या 32 व्या आणि 35 व्या मजल्यावर असलेल्या या दोन फ्लॅटची विक्री भारतातील सर्वात महागड्या निवासी मालमत्तेची विक्री ठरली आहे.
कोण आहे मालक ?
32 व्या आणि 35 व्या मजल्यावर या दोन्ही फ्लॅट 22,572 चौरस फूट जागेचा असून या घरातील खिडकीतून निळ आकाशासोबत निळा समुद्र मनं मोहून घेतो. वरळी परिसर हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक आहे. इथे अनेक मोठं सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपती राहतात. 639 कोटी रुपयांच्या फ्लॅटसाठी 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरण्यात आला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढा महागड्या फ्लॅट कोणी विकत घेतला?
आघाडीच्या फार्मा कंपनी यूएसव्ही इंडियाच्या अध्यक्षा लीना तिवारी यांनी हे दोन्ही फ्लॅट खरेदी केले आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या मते, लीना तिवारीने देशातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता खरेदी करून अनेक मोठ्या नावांना मागे टाकले आहे. लीना तिवारी यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये केली जाते. यूएसव्ही इंडिया कंपनीची स्थापना लीनाचे दिवंगत आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये केली होती. 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या मालक लीना मीडिया कॅमेऱ्यांपासून आणि सोशल मीडियापासून दूर राहतात.
त्यांची फार्मा कंपनी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आणि मधुमेह औषधांच्या क्षेत्रात भारतातील पहिल्या 5 कंपन्यांमध्ये आहे. कंपनी सक्रिय औषध घटक (एपीआय), इंजेक्शनेबल आणि बायोसिमिलर औषधे देखील तयार करते. मुंबईत राहणारी लीना बहुतेकदा सामाजिक कार्यक्रम आणि पार्ट्यांपासून दूर राहते, जरी ती सामाजिक कार्यात बरीच सक्रिय असते.
