पुण्यात 18 हजार कोंबड्यांचा मृत्यू; 80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान

पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातच आता याचा फटका आता कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बसला आहे. दौंड तालुक्यातील हातवळण मध्ये वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाले आहे. शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्याने 18 हजार कोंबड्या मेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे 80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान झाले आहे.

दौंड तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले यांचे वादळी वाऱ्याच्या पावसाने पोल्ट्री शेडचे पत्रे आणि भिंती कोसळल्या. यामुळे पोल्ट्री शेड मधील 18000 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे शेतकऱ्याचे 80 ते 85 लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *