श्री क्षेत्र शिंगणापूर हे शनिदेवाचे जागृत स्थान म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूरण भारतात प्रसिद्ध आहे. भारताच्या काना कोपऱ्यातून भाविक शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पहायचे नसते. मागचे कारण समजल्यावर कुणीच चुकूनही ही चूक करणार नाही. जाणून घेऊया शनिदेवाचे जन्मस्थान असलेल्या शिंगणापूरबाबतची सहा रहस्य.
नगर- औरंगाबाद राज्यमार्गावरील घोडेगावपासून पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर, तर नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरीपासून पश्चिमेस वीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
1 शनि शिंगणापूरमध्ये घरं काय, बँकांना देखील दरवाजे
शनि शिंगणापूर गावातील लोकांची शनि देवावर प्रचंड श्रद्धा आहे. यामुळेच कोणी घरांना दरवाजे लावण्याचा प्रयत्न देखील करत नाही. गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामागे साडेसात वर्षांच्या अशुभ कालावधीचा शाप शनि देव देतात असे येथील ग्रामस्थ मानतात.घरांना दरवाजे नसतानाही गावात चोरीसारख्या घटना घडत नाहीत. यामुळेच इथे घरं, सर्व कार्यालये तसेच बँंकाना देखील दरवाजे नाहीत. शनि शिंगणापूर गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून वाचवतो.
2 शनिदेव मूर्तीच्या स्वरूपात नाही
येथे शनिदेव मूर्तीच्या स्वरूपात नाहीत. .येथे एका लांब काळ्या दगडाची शीळाआहे. याती पूजा केली जाते. येथे कोणतेही मंदिर नाही. किंवा छत नाही. शनिदेवाची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाची आहे. 5 फूट 9 इंच उंच आणि 1 फूट 6 इंच रुंद असलेली ही मूर्ती सूर्यप्रकाशात संगमरवरी प्लॅटफॉर्मवर बसलेली आहे.
3 प्रत्येक शनि अमावस्येला विशेष पूजा
शनिवारी येणाऱ्या अमावस्येला तसेच दर शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. येथे दररोज पहाटे ४ आणि सायंकाळी ५ वाजता आरती केली जाते. शनि जयंतीला, प्रसिद्ध ब्राह्मणांना बोलावून ‘लघु रुद्राभिषेक’ केला जातो. हा कार्यक्रम सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालतो.
4 काका-पुतण्या एकत्र मंदिरात गेल्यास नशिब चमकते
एकदा शिंगणापूरमध्ये पूर आला होता. सगळं काही वाहून गेलं. मग एका माणसाने पाहिले की झुडुपात एक मोठा आणि लांब दगड अडकला आहे. कसा तरी त्याने तो दगड खाली आणला, तो एक अद्भुत दगड होता. जेव्हा त्याने तो दगड फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून रक्त येऊ लागले. हे पाहून तो घाबरला आणि तिथून पळून गेला आणि गावात जाऊन ही घटना सांगितली. हे ऐकून अनेक लोक दगडाजवळ गेले आणि तो उचलण्याचा प्रयत्न केला पण कोणीही तो उचलू शकले नाही. मग एका रात्री शनिदेव त्याच माणसाकडे स्वप्नात आले आणि म्हणाले की मी स्वतः त्या दगडाच्या रूपात शनि आहे. जर काका आणि पुतण्यांनी मिळून मला उचलले तर मी उठेन. त्या माणसाने हे स्वप्न गावकऱ्यांना सांगितले. मग त्याच गावातील मामा मांजे नावाच्या एका व्यक्तीने तो दगड उचलला आणि सूर्यप्रकाशाखाली एका मोठ्या शेतात ठेवला. तेव्हापासून असे मानले जाते की जर काका-पुतणे या मंदिरात दर्शनासाठी गेले तर ते फायदेशीर ठरते अशी अख्यायिका आहे.
5 एका मेंढपाळाला हा दगड सापडला
शनि शिंगणापूरबाबत आणखी एक अख्यायिका सांगितली जाते. या आख्यायिकेनुसार, भगवान शनिदेवाच्या रूपातील हा दगड एका मेंढपाळाला सापडला. शनिदेवाने स्वतः मेंढपाळाला सांगितले की, या दगडासाठी कोणतेही मंदिर न बनवता तो मोकळ्या जागेत बसवा आणि त्यावर तेलाने अभिषेक करा. तेव्हापासून येथे तेलाने अभिषेक करण्याची परंपरा चालू आहे.
6 शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहू नका
शनि देावाबाबतचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर चुकूनही मागे वळून पहायचे नसते. एका अख्यायिके नुसार असे म्हटले जाते की जो कोणी शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर आवारात प्रवेश करतो त्याने दर्शन घेऊन पुन्हा बाहेर येईपर्यंत मागे वळून पाहू नये. जर त्याने असे केले तर शनिदेव त्याला आशीर्वाद देत नाहीत. त्याचे येथे येणे निष्फळ ठरते असे सांगितले जाते.