22 सप्टेंबर रोजी साधू-संतांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज वाराणसीत अन्याय प्रतिकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी रॅलीतल्या नागरिकांनी जोरदार दगडफेक आणि जाळपोळ केली.
या घटनेमुळे कोतवाली, चौक आणि दशाश्वमेघ स्टेशन परिसरात कर्फ्यू लावण्यात आला होता. मात्र काही वेळाने हा कर्फ्यू हटविण्यात आला. ज्याठिकाणी साधू-संतांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याठिकाणी रॅली आल्यानंतर नागरिकांचा संताप वाढला आणि त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली.
या रॅलीमध्ये भाजपसह काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

