महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. तसंच, घरगुती हिसांचाराच्या गुन्हेही वाढले आहेत. अलीकडेच अमरावती जिल्ह्यात एक क्रूर घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीवर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीतील अंजनगाव सूर्जी तालुक्यात हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. पतीनेच त्याच्या पत्नीवर शारीरिक संबंध ठेवण्यास एका नातेवाईकाला भाग पाडले असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार रहिमापूर पोलिसांनी पीडितेच्या पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
