आकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू

आकाशात विमान उडवतांनाच पायलटचा मृत्यू

बोस्टन जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि विमानातच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवतांनाच पायलटचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पायलटनं अर्ध्या रस्त्यातून विमान परत न्यूयॉर्कला आणलं.

अमेरिकन एअरलाइनचे प्रवक्ते एंड्रिया ह्यूजली यांनी सांगितलं की, फ्लाइट ५५० रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजून ५५ मिनीटांनी फिनिक्सहून बोस्टनकडे जायला निघालं. विमानातील पायलटची तब्येत अचानक बिघडली आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा सहाय्यक पायलटनं सकाळी सात वाजताच्या आधी सायराक्यूज इथं विमान सुरक्षितपणे उतरवलं. त्यांनी सांगितलं, विमानात १४७ प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *