लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थांपैकी ८३ टक्के विवाहित, विधवांचे प्रमाण अत्यल्प; आकडेवारीतून महत्त्वाची माहिती आली समोर

महाराष्ट्र राज्य सरकाराची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगवेगेळ्या कारणांमुळे चर्चेत असते. या योजनेच्या लाभार्थ्यांबद्दल काही महत्त्वाची बाबी समोर आल्या आहेत. राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या २.५ कोटी लाभार्थ्यांच्या विश्लेषणात या योजनेच्या जवळपास ८३ टक्के लाभार्थी महिला या विवाहित असल्याचे समोर आले आहे. तर अविवाहित लाभार्थी ११.८ टक्के आणि विधवा लाभार्थ्यी ४.७ टक्के आहेत.

तर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटीत, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचे प्रमाण हे एकत्रितपणे १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी ०.३ टक्के, सोडून दिलेल्या महिला ०.२ टक्के आणि निराधार महिला ०.१ टक्के इतक्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *