सांगलीत हळदीला क्विंटलला २१ हजारांचा दर

 सांगलीच्या बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीला मंगळवारी झालेल्या सौद्यात क्विंटलला २१ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. नव्या हंगामातील ३ हजार ८१३ पोती हळदीची आवक झाली असून सरासरी १५ हजार २०० रुपये दर मिळाला.

नवीन हंगामातील हळद सौद्याचा आज जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि मदत व पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक संग्राम पाटील, बाबगोडा पाटील, आनंदराव नलवडे, काडाप्पा वारद, मारूती बंडगर, प्रा. सिकंदर जमादार, सचिव महेश चव्हाण, सांगली चेंबर्सचे पदाधिकारी, व्यापारी, अडत दुकानदार, खरेदीदार व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *