कोकणातून येणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंतच धावणार; कारण जाणून घ्या!

सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळं कोकण रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या तीन गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार आहे. विस्तारीकरणाचे काम शिल्लक असल्याने हा कालावधी वाढला आहे.

सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळं याचा फटका मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळं प्रवाशांची ओढाताण व हैराणी होण्याची शक्यता आहे.

जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांचे सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत धावत आहेत. सुरुवातीला हा कालावधी 31 जानेवारीपर्यंत होता मात्र आता हा कालावधी वाढवून 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे. तस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (12134) या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकावर संपणार आहे. मडगाव जंक्शन-सीएसएमटी तेजस (22120) आणि मडगाव जंक्शन-सीएसएमटी जनशताब्दी (12052) गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.

 रेल्वे फाटक‌ तासंतास उघडत नसल्याने नागरिकांचा संताप

मध्ये रेल्वेच्या खडवली स्थानकादरम्यान असणारे रेल्वे फाटक‌ तासनतास उघडत नसल्याने खडवली व पडघा परिसरात नागरिकांना बराच वेळ तात्काळत उभं रहावं लागतं आहे. या ठिकाणी चार ते पाच लोकल व एक्स्प्रेस गाड्या गेल्यानंतरच हे फाटक उघडले जाते. यामुळं रुग्णवाहिका असो किंवा इतर कोणतीही अत्यावश्यक सेवा असो यांना ही यांचा फटका बसत आहे. या फाटकातून दिवसाला हजारो वहानं ये-जा करत असतात. याचा फटका रुग्ण, नागरिक, शालेय विद्यार्थी, चाकरमानी यांना सहन करावा लागतोय. तासनतास फाटक उघडत नसल्याने या रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत असल्याने‌ वाहन चालक व नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. फाटक उघडण्याच्या वेळेत बदल करावा अशी मागणी येथून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *