समीर गायकवाडच्या पोलिस कोठडीत वाढ

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलिस कोठडीत आज (शनिवार) दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
 
समीर गायकवाड याला आज न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची म्हणजे २८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. या वेळी न्यायालयामध्ये समीरचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये चांगला युक्तिवाद रंगला. या वेळी समीरचे वकील अँड. सुहासे म्हणाले कि, आम्ही कोणावर अन्याय होऊ नये म्हणून समीरचे वकीलपत्र घेतले आहे. समीरच्या आवाजाचे नमुने जुळले म्हणजे सामीरनेच खून केला असे होत नाही. ज्या कारणासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून घेतली त्याचा तपासच केला नाही. तर, रुद्र आणि समीरचा काहीही संबंध नसल्याचे, समीरच्या वकिलांनी सांगितले. २३ मोबाईल आणि ३३ सिमकार्ड मिळाली आहेत, मग पुन्हा कोठडी कशाला हवी आहे अशी विचारणा सुद्धा या वेळी वकिलांनी केली. 
 
सरकारी वकिलांना कोल्हापूरच्या वाकिलांनीही युक्तिवादासाठी मदत करत कोल्हापूरमध्ये सध्या गणेशोत्सव सुरु आहे त्यामुळे चौकशी आणि तपासासाठी पोलिस बळ कमी पडत आहे. म्हणून समीरची पोलिस कोठडी वाढवून मिळावी असा युक्तिवाद या वेळी  अँड. विवेक घाडगे यांनी केला. तर समीरला कुंभ मेळ्यात दोनच डुबक्या का मारायाच्या आहेत, या वरून दोन लोकांची हत्या केले म्हणून दोनच्या डुबक्या असे दर्शवायचे आहे का असा प्रश्न या वेळी उपस्थित केला.
 
पोलिसांनी माहिती देताना सांगितले, कि सनातनच्या श्रद्धा पवार हिची चौकशी अजुन सुरु झालेले नाही. त्याच्या या प्रकरणात भूमिका आहे का, हे तपासण्याचे काम सुरु आहे. जप्त केलेल्या मोबाईलचा तपास देखील सुरु आहे. समीर तपसात मदत करत नसल्यामुळे त्याची मानसिक (ब्रेन मॅपिंग) करण्यात येणार आहे. कोणते शास्त्र वापरले हे तपासयचे आहेत. हे मुद्दे उपस्थित करत चार दिवस पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी या वेळी न्यायालयात करण्यात आली. पुणे प्रयोगशाळेत पाठविलेले आवाजाचे नमुने समीरच्या आवाजाशी जुळले असून गुजरातमधील रिपोर्ट अजून आलेला नाही, समीरची मैत्रीण ज्योति कांबळे हिने आपल्यासमोर समीरने पानसरे यांची हत्या केल्याचे बोलले आहे. तसेच २३ मोबाइल व ३३ सीमकार्ड जप्त केले आहेत. याबाबत प्रजापति या व्यक्तीकडून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. तर या तपासात प्रजापती याने पनवेल इथल्या साधकांचे २३ मोबाईल समीरला दिले आहेत, असे तपासात समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *