मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने मोबाईलप्रेमींना मेगाऑफर दिली आहे. कॅनव्हास स्लायव्हर 5 आणि कॅनव्हास नाईट 2 या दोन स्मार्टफोन्सना मायक्रोमॅक्सने एक्सचेंज ऑफरमध्ये बाजारात उतरवलं आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 9 हजार 999 रुपयांना असणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनची बाजारातील किंमत अनुक्रमे 18 हजार 999 आणि 17 हजार 499 रुपये एवढी आहे. ही ऑफर 15 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्लायव्हर 5 मध्ये 4.8 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. ज्यावर कॉर्निंग गोरिल्ल ग्लास 3 प्रोटेक्शन दिलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.2 GHZ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 क्वाडकोर 64 बिट प्रोसेसर आहे. शिवाय 2 GB रॅम आणि 16 GB इंटरनल मेमरीही देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये सोनी सेन्सरसोबत 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. सोबत 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराही आहे. 4G नेटवर्क सपोर्टिव्ह असलेल्या या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 2000mAh एवढी आहे. कनेक्टिव्हीटीमध्ये ब्लूटूथ आणि वायफायचाही समावेश आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास नाइट 2 मध्ये 5 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.5GHZ स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टोकोर चिपसेटवर काम करतं. 2 जीबी रॅम आणि एक्स्पांडेबल स्टोरेजसाठी 32 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डचा उपयोग करु शकता. 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

