नागपूरमध्ये चक्क पाण्याच्या वादातून एका शेजा-याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नरसाळा परिसरातील राधा रमण कॉलनीत ही दुर्दैवी घटना घडली.
पाण्यासाठी झालेल्या हाणामारीत लक्ष्मण ढोमने या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्या करणा-या गोवर्धन शेंडे नावाच्या शेजा-याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिक पाणी साठवून ठेवतात.
सोमवारी रात्री ढोमने यांनी शेंडे यांच्या ड्रममधून पाणी घेतले. याआधीही २ ते ३ वेळा शेंडे यांच्या ड्रममधून पाणी चोरीला गेले होते. त्यामुळे ढोमने यानेच पाणी चोरल्याचा समज झाल्याने त्या दोघांमध्ये बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली.
यावेळी शेंडे याने ढोमने यांच्या डोक्यात फरशी घातली. त्यात गंभीर जखमी झाल्याने ढोमने यांचा मृत्यू झाला.

