राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 3 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यासाठी नागपूरमध्ये पोचले आहेत. आज दुपारी ते यवतमाळला पोचतील. बुधवारी यवतमाळमधल्या पिंपरी बुटी गावाला ते भेट देतील.
या गावात मुख्यमंत्र्यांनी रात्रभर मुक्काम केला होता. शेतकऱ्यांच्या घरी जेवणही घेतलं होतं. शांताबाई ताजने या महिलेला मदतीचं आश्वासन दिलं होतं. मात्र, याच महिलेनं 12 जूनला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या महिलेच्या मुलांची शरद पवार भेट घेणार आहेत.
या गावाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भेट दिली आहे. 24 सप्टेंबरला नागपूरमधल्या कार्यकर्ता मेळाव्याला पवार मार्गदर्शन करणार आहेत.
संबंधित बातम्या:
शरद पवार पाण्यासाठी तरुणांची डोकी भडकवतात, विखेंची विखारी टीका

