पाण्याच्या टाकीखाली दबून करुण अंत

पाण्याच्या टाकीखाली दबून करुण अंत

भीषण पाणी टंचाई शेतकऱ्याच्या जीवावर उठली आहे. उस्मानाबादच्या धारुर गावात बैलगाडीतून पाणी आणताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. बशीर सय्यद असं त्यांचं नाव आहे.

पाणीटंचाईमुळे बशीर नेहमीप्रमाणे बैलगाडीत पाण्याची टाकी ठेवून पाणी आणतं होते. मात्र अचानक बैलगाडीचा मधला दांडा तुटला आणि भरलेली पाण्याची टाकी शेतकऱ्यांच्या अंगावर पडली. बैलगाडीचा दांडा तुटल्यानंतर बैलांची जोडी पुढे गेली आणि गाडीचा वजनदार भाग आणि भरलेली टाकी शेतकऱ्याच्या अंगावर पडली. यामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही भीषण पाणी टंचाई असून दिवसाला 164 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *