हार्बर रेल्वे मार्गावर ऐरोली स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन अचानक बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास मालगाडीचे इंजिन बिघडल्याने ठाण्याहून वाशीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे तर वाशीहून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरू आहे.
वाहतूक पुर्ववत होण्यासाठी तासभर लागण्याची शक्यता आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर सतत सुरू असलेल्या गोंधळामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल झाले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सीएसटी स्थानकात लोकल प्रवेश करत असताना रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामुळे हार्बरची यंत्रणा कोलमडून पडली होती.

